कारंजा (लाड) येथे विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षा मार्गदर्शन सभा संपन्न

कारंजा (लाड) येथे विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षा मार्गदर्शन सभा संपन्न

कारंजा (लाड) येथे विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षा मार्गदर्शन सभा संपन्न

कारंजा (लाड) | प्रतिनिधी

कारंजा (लाड) येथील जे. सी. हायस्कूल व ज्युनियर कॉलेज आणि आर. जे. चवरे हायस्कूल अँड कॉन्व्हेंट यांच्या संयुक्त विद्यमाने,

तसेच विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळ यांच्या सहकार्याने विद्यार्थी विज्ञान मंथन (VVM) परीक्षा मार्गदर्शन सभा यशस्वीरीत्या संपन्न झाली.

या कार्यक्रमात परिसरातील १८ शाळांचे समन्वयक उपस्थित राहिले. राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या या विज्ञान प्रतिभा उपक्रमाबाबत

जागरूकता वाढवणे व विद्यार्थ्यांचा सहभाग प्रोत्साहित करणे हा या मार्गदर्शन सभेचा उद्देश होता.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर अतिथींचा सत्कार व स्वागत सोहळा पार पडला.

या सभेला गिरीश जोशी (निवृत्त बीएसएनएल अभियांत्रिकी प्राध्यापक, विज्ञान भारती विदर्भ खजिनदार व महाराष्ट्र-गुजरात झोनल VVM समन्वयक),

माधुरी देहडकर (निवृत्त पर्यवेक्षिका, राज्य समन्वयक, VVM विदर्भ) आणि विनय मुकलवार (निवृत्त गणित शिक्षक, राज्य समन्वयक, VVM विदर्भ) हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

  • माधुरी देहडकर व विनय मुकलवार यांनी VVM परीक्षेची उद्दिष्टे, रचना व फायदे याविषयी मार्गदर्शन केले.

  • गिरीश जोशी यांनी नोंदणी प्रक्रियेचे थेट प्रात्यक्षिक करून समन्वयकांना प्रत्यक्ष मार्गदर्शन केले.

  • सौ. पूजा हेडा, इन्चार्ज, आर. जे. चवरे कॉन्व्हेंट यांनी भविष्यातील कृती आराखडा मांडत विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी उपाय सुचवले.

प्रश्नोत्तर सत्रात शिक्षकांनी विचारलेल्या शंकांचे निरसनही करण्यात आले.

या कार्यक्रमात मागील वर्षीच्या VVM परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच विज्ञान भारतीतर्फे यजमान शाळांचा गौरव करण्यात आला.

विजय भड सरांना जिल्हा स्तरावरील आयडॉल शिक्षक सन्मान मिळाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गार्गी रावळे व नेतन्या मांजरे यांनी समर्थपणे केले.

या प्रसंगी प्राचार्य भारत हरसुले, प्रवास गंधक, अनीता चोपडे (प्राचार्या, आर. जे. चवरे हायस्कूल), पूजा हेडा, डॉ. आर. सी. मुकवाने (VIBHA समन्वयक)

आणि विजय भड (VIBHA समन्वयक) यांसह मान्यवर उपस्थित होते.

सभेचा समारोप उत्साहवर्धक व प्रेरणादायी वातावरणात झाला. विज्ञान शिक्षणाची चळवळ अधिक जोमाने पुढे नेण्याचा संकल्प या मार्गदर्शन सभेतून दृढ झाला.

READ ALSO :https://ajinkyabharat.com/punda-yehehe-dahihandi-utsav-jallashat/