कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती : उपसभापतीपदी प्रकाश लिंगाटे यांची बिनविरोध निवड
कारंजा (लाड)- कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीत प्रकाश वासुदेवराव लिंगाटे यांची
बिनविरोध निवड (दि.२५) झाली आहे. निवडणुकीदरम्यान इतर कोणाचाही अर्ज न आल्याने त्यांची निवड औपचारिकरीत्या जाहीर करण्यात आली.
या निवडीनंतर सदस्यांनी समाधान व्यक्त करत समितीच्या कार्याला नवे बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. उपसभापती झाल्यानंतर प्रकाश लिंगाटे यांनी
सर्व संचालक व सभासदांचे आभार मानले. शेतकऱ्यांच्या हितासाठी व बाजार समितीच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या वेळी आमदार तथा सभापती सईताई प्रकाश डहाके, माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके, देवव्रत डहाके, खरेदी विक्री अध्यक्ष अरुण ताथोड, संचालक दिनेश
राठोड, नितीन नेमाने, बाबुराव चौधरी, विजय हिवाळे, वीरेंद्र चारथळ, प्रवीण वानखडे, देवेंद्र राऊत, श्रीमती सुनंदा गुंजाटे, सौ. कावेरी पारे, अरुण वानखडे,
रवींद्र घुले, बालचंद्र जाधव, साहेबराव तुमसरे, ब्रिजमोहन मालपाणी, अनिल पाकधणे, हसन चौधरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.निवडणूक प्राधिकृत तथा
सहाय्यक निबंधक अधिकारी (प्रशासन) जिल्हा उपनिबंधक सहकारी वाशिम आर. आर. सावंत यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पूर्ण झाली.
Read also :https://ajinkyabharat.com/masa-sisa-udegav-yehehe-mansetrfe-donation-shibir-yashasvi/
