कारंजात विश्वमांगल्य सभेच्या मातृशक्तीची भव्य कावड यात्रा उत्साहात संपन्न

कारंजात विश्वमांगल्य सभेच्या मातृशक्तीची भव्य कावड यात्रा उत्साहात संपन्न

संघटन शक्ती राष्ट्रनिर्माणात ठरते प्रभावी

कारंजा (प्रतिनिधी) :

रविवार, दिनांक ३ ऑगस्ट रोजी कारंजा शाखेच्या विश्वमांगल्य सभेच्या वतीने आयोजित मातृशक्तीची

भव्य कावड यात्रा भक्तिपूर्ण आणि उत्साहात मोठ्या जल्लोषात पार पडली.

या यात्रेचा शुभारंभ आमदार सौ. सईताई डहाके यांच्या हस्ते कावड पूजन करून झाला.

यावेळी सौ. वंदनाताई मालपाणी व सौ. शिवकांताताई इन्नाणी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

पवित्र सप्तनद्यांचे आवाहन करून टिळक चौकातील विहिरीच्या जलाची पूजा करत यात्रा सुरू झाली.

त्यानंतर श्री नर्मदेश्वर महादेवाला शिवमहिम्न स्तोत्राच्या गजरात अभिषेक करण्यात आला.

कावड पूजनानंतर यात्रेची वाजतगाजत सिद्धेश्वर मंदिराकडे मिरवणूक काढण्यात आली.

संपूर्ण शहरात भक्तिभावाचे व उत्सवाचे वातावरण अनुभवायला मिळाले.

यात्रेत विविध समाजातील जवळपास ११०० ते १२०० महिलांनी सहभाग घेतला.

शहरातील विविध चौकांमध्ये पारंपरिक लोकनृत्य व सांस्कृतिक सादरीकरण करण्यात आले.

बंजारा समाजाचे पारंपरिक नृत्य, दुधोरा येथील महिलांचे पावली नृत्य, गुजराथी समाजाचा गरबा,

डमरू पथक, भजनी मंडळे आणि जयघोष करणाऱ्या महिलांनी वातावरण भारावून टाकले.

कार्यक्रमात लहानग्यांचा सहभागही विशेष लक्षवेधी ठरला.

एकता गायकवाड भारतमातेच्या, प्रिया अडुळकर शंकराच्या, ओवी ढाकुलकर पार्वतीच्या,

अनवेश पायल गणपतीच्या आणि हरप्रीत पंजवानी संत झुलेलाल यांच्या भूमिकांमध्ये दिसून आल्या.

सिद्धेश्वर महादेव मंदिरात पोहोचल्यावर २१ महिलांनी २१ कलश खांद्यावर घेऊन मंदिराला पाच प्रदक्षिणा घातल्या.

त्यानंतर महादेवाला जलाभिषेक करण्यात आला.

या विशेष पूजेसाठी सौ. तेजश्रीताई डहाके व सौ. राखीताई चव्हाण प्रमुख पूजेस बसल्या.

कार्यक्रमाची सांगता महाआरती व प्रसाद वाटपाने झाली.

या यशस्वी कार्यक्रमासाठी विश्वमांगल्य सभेच्या कार्यकर्त्या, विविध सामाजिक संस्था व स्थानिक महिलांचे योगदान मोलाचे ठरले.

Read Also : https://ajinkyabharat.com/deori-yehetananabhau-sathe-kranti-senechaya-vati-on-panchamukhi-mahadev-yehe-kavad/