कारंज्यात ५१ मंडळांची गणेश स्थापना; डाळीपासून तयार पर्यावरणपूरक बाप्पा ठरले आकर्षण

कारंज्यात ५१ मंडळांची गणेश स्थापना; डाळीचा बाप्पा ठरला आकर्षण

कारंजा – कारंजा शहर पोलिस ठाणे हद्दीत यंदा ५१ तर ग्रामीण भागात ९ अशा एकूण ६० सार्वजनिक गणेश

मंडळांकडून गणेशाची स्थापना गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर (२७ ऑगस्ट) करण्यात आली.

तसेच सात गावांत “एक गाव, एक गणपती” ही संकल्पना राबविण्यात आली आहे.

यंदाच्या उत्सवात कारंजा जुना भाजी बाजार येथील श्रीमंत बाल हौशी सार्वजनिक

गणेश मंडळाची डाळीपासून तयार केलेली पर्यावरणपूरक गणेशमूर्ती  विशेष आकर्षण ठरत आहे.

ही मूर्ती आठ फूट उंच असून १० ते १२ प्रकारच्या डाळी-कडधान्यांचा वापर करून बनविण्यात आली आहे.

मंडळाचे अमित कऱ्हे यांच्या मते, मूर्ती बनविण्यास तब्बल १० दिवस लागले.

६ सप्टेंबरला विसर्जन

अनंत चतुर्दशी (६ सप्टेंबर) रोजी कारंज्यातील सर्व सार्वजनिक व घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे.

शहरात छत्रपती शिवाजी नगरातून दुपारी बारा वाजता मिरवणुकीस सुरुवात होईल.

मिरवणूक विविध चौकातून मार्गक्रमण करत अडाण नदीपात्र, तुळजापूर तलाव,

तसेच ड्रिमलॅंड सिटीतील विहिरीत पार पडणार आहे.

घरगुती गणपतीसाठी कृत्रिम तलावाची सोयही नगरपालिकेकडून करण्यात आली आहे.

२२५ पोलिसांचा बंदोबस्त

विसर्जन मिरवणूक शांततेत व सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी पोलीस विभाग सज्ज आहे.

उपविभागीय अधिकारी प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार

दिनेशचंद्र शुक्ला यांनी १५ अधिकारी, १०० पोलीस कर्मचारी,

७० होमगार्ड, २० जवानांचे आरसीपी पथक व २० जवानांचे सीआरपीएफ पथक

अशी २२५ जणांची फौज तैनात करण्याचे आदेश दिले आहेत.

याशिवाय ड्रोन व व्हिडिओ कॅमेऱ्याद्वारे मिरवणुकीचे चित्रीकरण केले जाणार आहे.

डीजे मुक्त मिरवणुकीचे आवाहन

“विसर्जन मिरवणुकीदरम्यान डीजेचा वापर न करता

डीजे-मुक्त मिरवणुकीसाठी सहकार्य करावे,”

असे आवाहन कारंजा शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला

यांनी सार्वजनिक गणेश मंडळांना केले आहे.

Read also :https://ajinkyabharat.com/rural-culture-darshan/