कराचीतील गोळीबारात ३ ठार, ६० हून अधिक जखमी 

पाकिस्तानात स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवावर दुखाचा डोंगर

पाकिस्तानात स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवावर दुखाचा डोंगर ; कराचीतील गोळीबारात ३ ठार, ६० हून अधिक जखमी 

कराची – पाकिस्तानाचा स्वातंत्र्यदिन साजरा करताना गुरुवारी (१४ ऑगस्ट) कराची शहरात झालेल्या अंधाधुंद गोळीबारात तिघांचा मृत्यू झाला असून ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत.

मृतांमध्ये एका ज्येष्ठ नागरिकासह ८ वर्षीय बालिकेचाही समावेश आहे.

 अजीजाबाद परिसरात गल्लीत फिरत असताना एका बालिकेला गोळी लागून जागीच मृत्यू झाला. कोरंगी भागातही एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे.

याशिवाय लियाकताबाद आणि महमूदाबाद परिसरातही गोळीबाराच्या घटना नोंदविण्यात आल्या आहेत.

जखमींना तातडीने सिव्हिल, जिना आणि अब्बासी शहीद रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्थानिक पोलिसांनी कारवाई सुरू केली असून काही संशयितांना अटक केली आहे.

त्यांच्या ताब्यातून आधुनिक शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत. अवैध शस्त्र बाळगण्याचे प्रमाण पाकिस्तानात वाढत चालल्याचे पोलिसांनी सांगितले.

कराचीतील पूर्वीच्या घटना

 माहितीनुसार, गेल्या वर्षी केवळ जानेवारी महिन्यातच कराचीतील विविध गोळीबाराच्या घटनांमध्ये ४२ जणांचा मृत्यू झाला होता, त्यात ५ महिलांचा समावेश होता.

याच महिन्यात २३३ जण जखमी झाले होते. बहुतेक घटना वैयक्तिक वाद आणि कौटुंबिक भांडणांमुळे घडल्या होत्या.

READ ALSO :https://ajinkyabharat.com/41-beckinger-timber-aani-reserved-reserved-plotwaril-bogus-damkam/