अकोट : विदर्भातील कपाशीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या कपाशीला प्रतिक्विंटल तब्बल 8 हजार रुपयांपर्यंत दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. यंदाच्या हंगामात कपाशीच्या दरात झालेली वाढ शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरत आहे.
अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत केवळ अकोला जिल्ह्यातीलच नव्हे तर बुलढाणा, अमरावती तसेच मध्यप्रदेशातील शेतकरीही मोठ्या प्रमाणावर कपाशी विक्रीसाठी येत आहेत. बाजारात चांगली आवक असूनही दर स्थिर राहिल्याने उत्पादकांना आर्थिक फायदा होत आहे.
बाजार समितीबरोबरच खाजगी विक्रेत्यांकडूनही कपाशीला स्पर्धात्मक दर मिळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या मालासाठी अधिक पर्याय उपलब्ध झाले आहेत. शासनाने जाहीर केलेल्या हमीभावानुसार भारतीय कापूस महामंडळ (CCI) मार्फत अकोट येथे सुरू असलेल्या कापूस खरेदी केंद्रावरही खरेदी वेगाने सुरू आहे. हमीभाव आणि खुल्या बाजारातील चांगले दर यामुळे शेतकरी योग्य दर मिळेल त्या ठिकाणी कपाशीची विक्री करत आहेत.
Related News
दरम्यान, बाजारातील सकारात्मक परिस्थिती कायम राहिल्यास पुढील काळातही कपाशी उत्पादकांना चांगला फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. उत्पादन खर्च वाढत असताना मिळणारा समाधानकारक दर शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक आधार देणारा ठरत आहे. परिणामी, अकोट बाजार समिती पुन्हा एकदा कपाशी व्यापाराचे महत्त्वाचे केंद्र ठरत असल्याचे दिसून येत आहे.
read also : https://ajinkyabharat.com/appointment-of-the-appointed-gram-panchayat-administrator-for-the-time-being/
