कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद; ११ जुलैपासून नियमन लागू

कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद; ११ जुलैपासून नियमन लागू

मुजफ्फरनगर (उत्तर प्रदेश), 

उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथे ११ जुलैपासून सुरू होणाऱ्या कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून

राष्ट्रीय महामार्ग व गंगा कालवा मार्गावर वाहतुकीस निर्बंध लावण्यात आले आहेत.

Related News

११ जुलैपासून अवजड वाहने बंद, तर १८ जुलैपासून सर्वच प्रकारच्या वाहनांवर बंदी लागू केली जाईल,

अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधीक्षक संजय कुमार यांनी दिली आहे.

यंदा ११ ते २३ जुलै दरम्यान कांवड यात्रा पार पडणार असून, यामध्ये सुमारे ५ कोटी भाविक सहभागी होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे जिल्हा प्रशासनाने मार्ग डायवर्जन योजना आखत सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत.

मुख्य ठिकाणे १८ झोन आणि ८८ सेक्टरमध्ये विभागण्यात आले असून, १५४३ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

कांवड छावण्यांचे आयोजक आणि कार्यकर्त्यांना ओळखपत्र आणि कॅमेरे लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत,

जेणेकरून कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची खात्री करता येईल.

Read Also : https://ajinkyabharat.com/akola-district-suicide-hit-shetkyanchi-number-70-var-25-3199-shetkari-mrityo/

Related News