‘कांतारा चॅप्टर 1’चा ट्रेलर प्रदर्शित

कांतारा चॅप्टर 1 चा थरारक ट्रेलर

 पंजूर्ली देवाचा रहस्यमयी इतिहास उलगडणार

मुंबई : अभिनेता-निर्माता ऋषभ शेट्टीचा बहुप्रतिक्षित ‘कांतारा चॅप्टर 1’चा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कांतारा’ने भारतीय चित्रपटसृष्टीत अभूतपूर्व यश मिळवलं होतं. आता त्याचा प्रीक्वेल घेऊन ऋषभ शेट्टी प्रेक्षकांसमोर येत असून ट्रेलरनेच चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.‘कांतारा चॅप्टर 1’ 2 ऑक्टोबर रोजी जगभरात कन्नड, हिंदी, तेलुगू, मल्याळम, तमिळ, बंगाली आणि इंग्रजी अशा सात भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे, रिलीजला अवघे 10 दिवस शिल्लक असताना ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये कथानक कांताराच्या पौराणिक इतिहासाकडे नेण्यात आले असून, आतापर्यंत न ऐकलेली गूढ कहाणी यातून उलगडणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.या चित्रपटात ऋषभ शेट्टी कोणती भूमिका साकारणार, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. मात्र, या चित्रपटासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या मदतीने एक भव्य युद्ध सीन उभारण्यात आला असून, यात 500 हून अधिक सैनिक व तब्बल 3 हजार लोक सहभागी झाले होते. 25 एकरांवर उभारलेला हा सीन 45 ते 50 दिवसांत चित्रित करण्यात आला असून, तो भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या दृश्यांपैकी एक ठरणार आहे.ट्रेलरमधील गूढ, रहस्यमय वातावरण, पंजूर्ली देवाचा इतिहास आणि प्रचंड भव्यदिव्य सेट्स यामुळे ‘कांतारा चॅप्टर 1’ हा प्रेक्षकांसाठी शहारे आणणारा अनुभव ठरणार, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

read also : https://ajinkyabharat.com/hataras-hakalam-okh-lapwoon-ascendant-gang-rape/

Related News