कंगना राणौतची मोठी मागणी!

रद्द करण्यात आलेले तीन कृषी कायदे परत आणावेत

केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्याला मोठा विरोध

झाला होता. या विरोधानंतर हे कायदे मागे घेण्यात आले होते.

Related News

दरम्यान, आता हेच तीन कायदे पुन्हा आणण्याची मागणी भाजपा

खासदार कंगना राणौत यांनी केली आहे. हे तिन्ही कायदे

शेतकऱ्यांच्या हिताचे असून ते परत आणण्याची मागणी त्यांनी

करायला हवी, असे कंगना रणौत यांनी सांगितले. यामुळे आता

राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होऊ शकतात. कंगना राणौत

यांनी सोमवारी मंडीच्या नाचन विधानसभेत कार्यकर्त्यांची बैठक

झाली. यावेळी माध्यमांसोबत बोलताना त्यांनी ही मागणी केली.

त्यांच्या विधानावर आता काँग्रेसमधून प्रतिक्रिया आली आहे.

कंगना राणौत यांच्या विधानावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे.

काँग्रेसने सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली.

‘शेतकऱ्यांवर लादलेले तीन काळे कायदे परत आणले पाहिजेत.

असे भाजप खासदार कंगना राणौत यांनी सांगितले. देशातील

७५० हून अधिक शेतकरी शहीद झाले, तेव्हाच मोदी सरकारला

जाग आली आणि हे काळे कायदे मागे घेण्यात आले. आता भाजप

खासदार पुन्हा हे कायदे मागे घेण्याचा विचार करत आहेत. काँग्रेस

शेतकऱ्यांसोबत आहे. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या खासदारांनी

कितीही प्रयत्न केले तरी हे काळे कायदे परत येणार नाहीत’,

असं या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/actress-swara-bhaskars-husband-is-interested-in-awakening-anushaktinagar-from-sp/

Related News