तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या ऑपरेशन प्रहार मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली आहे. मौजे कानडी (बाजार) येथे चालू असलेल्या देशी दारू अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून तब्बल ₹1 लाख 26 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरातील अवैध धंद्यावाल्यांचे धाबे दणाणले आहेत.स्थानिक आरोपी अमर उद्धव घोडे (वय 29, रा. टेंभी) आणि जनार्दन तुकाराम खंडारे (वय 70, रा. विराहित) यांच्या अड्ड्यावर बुधवारी पोलिसांनी छापा टाकला. यावेळी देशी दारू बनविण्याचे साहित्य, तयार दारू तसेच संबंधित मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली, पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गंगाधर दराडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पीएसआय अभिषेक नवघरे, बीट जमादार दत्तात्रय चव्हाण, जमादार नामदेव मोरे, प्रदीप धामणे, नागसेन वानखडे, गजानन काळे, नरहरी देवकते, भागवत गांजवे, मयूर खडसे, भूषण मुखमले, तसेच होमगार्ड सैनिक गणेश जानोरकर यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.पुढील तपास पिंजर पोलीस करीत आहेत.
READ ALSO : https://ajinkyabharat.com/vidyarthayani-rabwale-self-governance-miscellaneous-program-program/
