कळंबी महागाव येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

कळंबी महागाव येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

जी.प.प्रा.शाळा कळंबी महागाव येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा, कळंबी महागाव येथे ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेश सावळे यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून केली.

यानंतर शाळेचे मुख्याध्यापक गजानन बावस्कर यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.

विशेष म्हणजे भारतीय सैन्यात कार्यरत असलेले गावाचे अभिमान निलेश सावळे कार्यक्रमाला उपस्थित राहिले.

विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून देशभक्तीपर घोषणा दिल्या तसेच सुंदर कवायत व देशभक्तिपर भाषणे सादर केली.

कार्यक्रमाला गावातील नागरिक, महिला, तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहून वातावरण देशभक्तीमय केले.

READ ALSO :https://ajinkyabharat.com/house/