“कळंबी महागाव जि.प. शाळेत विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन अनोखा वाढदिवस साजरा

शैक्षणिक साहित्य वाटप करून वाढदिवस साजरा

बाळापूर तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा कळंबी महागाव येथे २९ सप्टेंबर रोजी एक वेगळाच उपक्रम राबवण्यात आला. शाळेतील शिक्षिका सुषमा देशपांडे यांनी आपल्या मुलगा डॉ. श्रीकांत देशमुख यांचा वाढदिवस अगदी अनोख्या पद्धतीने साजरा केला.नेहमीप्रमाणे खर्चिक सोहळा न करता देशपांडे मॅडम यांनी शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला एक लेटरबुक व एक पेन भेट दिला. “विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात जो आनंद मिळतो तो इतर कोणत्याही खर्चात मिळत नाही,” असे समाधान त्यांनी व्यक्त केले.या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. सर्व विद्यार्थ्यांनीही डॉ. श्रीकांत देशमुख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाला शाळेचे माजी व्यवस्थापन समिती अध्यक्ष कडू सावळे, पत्रकार श्रीकृष्ण पवार, मुख्याध्यापक गजानन बावस्कर, शिक्षक अमित वाघमारे तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ते अमर सावळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

read  also : https://ajinkyabharat.com/risodamadhyay-tribal-society-virat-morcha-tehsidarna-request/