कामरगाव :- वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथे विश्व हिंदू परिषद बजरंग दल व जय भोलेनाथ
मंडळ कडून दरवर्षीप्रमाणे श्रावण महिन्यातील दुसरा सोमवारी कावड शोभायात्रा काढण्यात आली
या कावळ यात्रेची सुरुवात कुऱ्हाड येथील बेंबळा नदी व कापशी नदीच्या संगम तटावरून
जल घेऊन सकाळच्या सुमारास सुरुवात करण्यात आली
या कावड यात्रेकरिता महिलांची मोठ्या संकेत विशेष उपस्थिती पाहायला मिळाली
तसेच गावातील तरुण मंडळी कावड घेऊन येताना
गावात ठीक ठिकाणी कावड यात्रेचे गावकऱ्यांकडून स्वागत करण्यात आले.
व त्यावेळेस गावात कावळ यात्रेच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात शेकडो नागरिकांचा जनसमुदाय उपस्थित असल्याचे दिसून आले.
उपस्थित असलेल्या कावड धारी व नागरिकांसाठी ठिकठिकाणी चहापाणी व नाश्त्याचे
आयोजन गावकऱ्यांकडून करण्यात आले.
अशा उत्स्फूर्त भक्तीमय वातावरणात गावात कावळ ची शोभायात्रा कडून ठिकठिकाणी कावळ चे पूजन करण्यात आले.
व कुऱ्हाड येथील कापशी व बेबळा नदीच्या संगमावरून आणलेले जल कामरगाव येथील महादेवाच्या प्राचीन मंदिरात
जय भोले नाथाचा गजर करत जल अभिषेक करून कावड यात्रेची समाप्ती करण्यात आली .
त्या वेळेस कामरगावात शिवभक्तीमय वातावरण दिसून आले.
Read Also : https://ajinkyabharat.com/bus-driver-banana-both-balak/