कामरगाव – विळेगाव दरम्यान भीषण अपघात, कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

भीषण

कारची मोटरसायकलला धडक : एकाचा मृत्यू, एक जखमी

कामरगाव –  अमरावती–कारंजा रोडवर कामरगाव ते विळेगाव दरम्यान भरधाव कारने मोटरसायकलला दिलेल्या

धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.

ही घटना काल घडली असून, कार चालकाविरुद्ध धनज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघातात मृत्यू व जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, आवेजोद्दीन नजीमोद्दीन (३५) व नजीमोद्दीन गयासोद्दीन

(५७, रा. मंगळवारा, कारंजा, जि. वाशिम) हे मोटरसायकलवरून कामरगाव–विळेगाव दरम्यान जात होते.

त्यावेळी पांढऱ्या रंगाची हुंडई कंपनीची वरणा कार (क्र. एमएच ३७ जी ४५१४) चालकाने

निष्काळजीपणे व भरधाव वेगाने गाडी चालवून मोटरसायकलला मागून जोरदार धडक दिली.

या भीषण धडकेत नजीमोद्दीन गयासोद्दीन (५७) जागीच ठार झाले तर आवेजोद्दीन नजीमोद्दीन (३५) जखमी झाला आहे.

धडक दिल्यानंतर कारचालकाने वाहन न थांबवता घटनास्थळावरून पलायन केल्याची माहिती आहे.

गुन्हा दाखल

या प्रकरणी नदिमोद्दिन निजामोद्दीन (३८, कारंजा) यांच्या फिर्यादीवरून कार

चालकाविरुद्ध कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) बीएनएस सह कलम १३४, १८४ मोटार वाहन कायद्यानुसार

गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास धनज पोलीस करीत आहेत.

Read also : https://ajinkyabharat.com/rape-is-not-a-hundabi-gunhe-department-karanara-report/