कल्याणमधील धक्कादायक प्रकरण उघडकीस

कल्याणात फसवणूकची नवी सराईत योजना उघडकीस

 कल्याण – राज्यात चोरी व फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच कल्याण पश्चिमेकडील आधारवाडी भागात एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
७० वर्षीय ज्येष्ठ नागरिक प्रमोद भास्कर जोशी यांना बनावट पोलीस अधिकारी बनून लूटले गेले.

काय घडलं?

रविवारी सकाळी प्रमोद जोशी सहजानंद चौक ते गणपती चौक दरम्यान चालत असताना एका ४० वर्षीय अनोळखी व्यक्तीने त्यांना धक्का दिला.
त्या व्यक्तीने मोबाईल जमिनीवर पाडल्याचे नाटक करून म्हटले –
“तुमच्या कारभारामुळे माझा मोबाईल फुटला आहे, मी पोलीस आहे, तुम्ही भरपाई द्या, नाहीतर मी तुम्हाला अटक करेन.”
हे ऐकून प्रमोद जोशी गोंधळून गेले. आरोपीने चालाकीने त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी आणि मोबाईल पळवला.
नंतर रिक्षात बसवून मोबाईल गॅलरीकडे नेण्याचे नाटक करून आरोपीने रिक्षा गांधारी रस्त्यावर थांबवली आणि मोबाईल रस्त्यावर फेकून दिला.
पण सोन्याची अंगठी गहाळ असल्याचे लक्षात येताच प्रमोद जोशी यांनी तात्काळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

पोलिस तपास सुरु

सहाय्यक पोलीस निरीक्षक तुळशीराम राठोड यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे.
पोलीस प्रशासनाने बनावट पोलीस अधिकाऱ्याचा त्वरीत शोध घेण्याचे आदेश दिले आहेत.
परिसरातील नागरिकांनी देखील या घटनेमुळे चिंता व्यक्त केली असून, ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर सरकार आणि पोलीस प्रशासनकडून कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे.

read also :https://ajinkyabharat.com/shivar-phericha-yashswi-event/