कल्याण – पश्चिमेतील आधारवाडी चौकातील मनोमेय मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये
घोर निष्काळजीपणाची घटना समोर आली आहे.
१० वर्षीय सिद्धार्थ गायकवाड याला टायफाईड आणि निमोनियाची लागण
झाल्यामुळे २३ ऑगस्ट रोजी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले गेले होते.
२५ ऑगस्ट रोजी डिस्चार्ज करताना डॉक्टरांनी मुलाला औषधे लिहून दिली.
मात्र नंतर समोर आले की, या प्रिस्क्रीप्शनमध्ये फक्त सिद्धार्थसाठी
नसून दुसऱ्या रुग्णांची डायबिटीज व रक्त पातळ करण्याची औषधे देखील समाविष्ट होती.
सकाळी मुलाला इंजेक्शन देण्यासाठी दुसऱ्या डॉक्टरांकडे गेल्यावर ही चूक उघडकीस आली.
डॉक्टरांनी कुटुंबीयांना या औषधांचा वापर टाळण्याचा सल्ला दिला.
या घटनेमुळे कुटुंबीय रुग्णालयात जाऊन गोंधळ घालून संबंधित डॉक्टरांविरोधात कारवाईची मागणी केली.
मनोमेय हॉस्पिटलच्या डॉक्टर सनी सिंग यांनी याबाबत स्पष्ट केले की,
ही चूक संबंधित डॉक्टरच्या दुर्लक्षामुळे झाली असून कुटुंबीयांना चुकीची औषधे न घेण्याचे सूचित केले गेले.
ही घटना मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलच्या गोंडस नावाखाली
रुग्णांच्या आरोग्याशी होणाऱ्या हलगर्जीपणाची गंभीर निदर्शक आहे.
तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारच्या डॉक्टरांवर कठोर कारवाई केली जाणे गरजेचे आहे,
जेणेकरून रुग्णांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होणार नाही.
Read also : https://ajinkyabharat.com/muthi-government-push-mns-shiv-sena-thackeray-gatachi-mahtwachi-meeting/
