कल्याण : “खड्डेमुक्त रस्ता दाखवा, १० हजारांचं बक्षीस मिळवा” — भाजप पदाधिकाऱ्यांचे केडीएमसीला आव्हान
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) हद्दीत पावसाळ्यामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या गंभीर बनली असून,
नागरिक आणि वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
या पार्श्वभूमीवर भाजप पदाधिकारी संतोष होळकर यांनी केडीएमसी प्रशासनाला थेट आव्हान दिले आहे.
होळकर यांनी जाहीर केले की, केडीएमसी हद्दीत सलग ५०० मीटर लांबीचा खड्डेमुक्त रस्ता जो दाखवेल, त्याला १५ ऑगस्ट रोजी १० हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाईल.
त्यांनी टीका केली की, “आयुक्तांनी पाहणी करून सूचना दिल्यानंतरही खड्डे भरण्याचे काम अपेक्षित गतीने झालेले नाही.
खड्डेमुक्ती हा केवळ कागदोपत्री दावा न राहता प्रत्यक्षात दिसला पाहिजे.”
या घोषणेमुळे केडीएमसी प्रशासनावर दबाव वाढला असून, 15 ऑगस्टपूर्वी खड्डेमुक्त रस्ता शोधण्यासाठी नागरिक सक्रिय होण्याची शक्यता आहे.
Read also :https://ajinkyabharat.com/pakistanavir-buddhist-harbhajan-singcha-sangha-bahraishkarachi-magani/