कालपासून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू :

कालपासून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू :

अकोला (प्रतिनिधी): इयत्ता दहावीचा निकाल १३ मे रोजी जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील

कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशाची प्रक्रिया जोमात सुरू झाली आहे.

१९ मेपासून सुरू झालेल्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमुळे महाविद्यालयांत विद्यार्थ्यांची गर्दी पाहायला मिळत आहे.

Related News

जिल्ह्यातील २६४ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये एकूण ३१ हजार ९०२ जागा उपलब्ध असून,

यंदा २५ हजार ७७० विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती, त्यापैकी २२ हजार ६४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल विज्ञान (सायन्स) आणि वाणिज्य (कॉमर्स)

शाखांकडे दिसून येत असून, कला शाखेच्या तुलनेत या शाखांना अधिक पसंती मिळत आहे.

प्रशासनाच्या माहितीनुसार, यंदा जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ऑनलाइन पद्धतीने प्रवेश घेता येणार आहे.

त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये अधिक सोयीचा अनुभव येत असून,

अनेक महाविद्यालयांमध्ये ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी विशेष मदत केंद्रे उभारण्यात आली आहेत.

Read Also : https://ajinkyabharat.com/akolidhi-ghirtya-ghalanya-vimanacha-ulagada/

Related News