काळेगावात स्मार्ट मीटरला विरोध

काळेगावात स्मार्ट मीटरला विरोध

जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये वीज ग्राहकांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता स्मार्ट मीटर बसविण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी उसळली आहे. यामुळे जुन्या मीटरच्या तुलनेत जास्त रिडींग दाखवून वीज बिले वाढत असल्याच्या तक्रारींना पेव फुटला आहे.काळेगावातही स्मार्ट मीटर बसवण्यात आले असून, स्थानिक नागरिकांनी त्याचवेळी विरोध दर्शवला होता. मात्र या विरोधाला न जुमानता गावात अनेक ठिकाणी स्मार्ट मीटर लावण्यात आले.गावकऱ्यांच्या मते, स्मार्ट मीटरमुळे जुन्या मीटरपेक्षा जास्त रिडींग होत असून, यामुळे ग्राहकांची आर्थिक पिळवणूक होत आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी “जुने मीटर परत द्यावेत आणि नवीन स्मार्ट मीटर काढून टाकावेत” अशी मागणी केली आहे.या मागणीसाठी काळेगावातील नागरिकांनी तालुक्यातील महावितरण कार्यालयात निवेदन सादर केले. गावकऱ्यांनी तातडीने लक्ष घ्यावे, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.

read also : https://ajinkyabharat.com/service-pandharwadyala-extreme-response/