कधी विकला वडापाव, कधी पुसली लादी..; ‘छावा’च्या दिग्दर्शकाचा संघर्षमयी प्रवास

कधी विकला वडापाव, कधी पुसली लादी..; ‘छावा’च्या दिग्दर्शकाचा संघर्षमयी प्रवास

‘छावा’ या चित्रपटाने जगभरात आपला डंका वाजवला आहे. मराठमोळ्या लक्ष्मण उतेकरांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय.

याआधीही त्यांनी काही दमदार चित्रपटांचं दिग्दर्शन केलंय. उतेकरांचा आतापर्यंतचा प्रवास हा काही सोपा नव्हता.

छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित ‘छावा’ दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचे तीन चित्रपट

हे 100 कोटींच्या क्लबमध्ये समाविष्ट आहेत आणि त्यांच्या आताच्या ‘छावा’ने तर थेट 700 कोटींचा गल्ला जमवला आहे.

उतेकरांचे हे चित्रपट कोट्यवधींची कमाई करणारे असले तरी त्यांनी सुरुवातीच्या काळात बराच संघर्ष केला आहे.

त्यांचा जन्म एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. त्यांच्या कुटुंबीयांचा चित्रपटसृष्टीशी काहीच संबंध नव्हता.

उतेकर हे आपल्या मेहनतीच्या जोरावर इथवर पोहोचले. घरची परिस्थिती सर्वसामान्य असल्याने त्यांनी सुरुवातीला अनेक प्रकारची कामं केली.

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. प्रदर्शनाच्या पंचविसाव्या दिवशीही या चित्रपटाची जोरदार कमाई सुरूच आहे.

यामध्ये विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली असून

मराठमोळे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

उतेकर यांचा हा पाचवा यशस्वी चित्रपट ठरला आहे. याआधी त्यांनी ‘लुका छुपी’, ‘जरा हटके जरा बचके’, ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’,

‘मिमी’ यांसारख्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. आता ‘छावा’मुळे केवळ भारतातच नाही तर जगभरात ते लोकप्रिय ठरत आहेत.

मात्र चित्रपटसृष्टीत नाव कमावणं हे उतेकरांसाठी सहजसोपं कधीच नव्हतं.

सुरुवातीच्या दिवसांत उतेकरांनी फिल्म स्टुडिओची लादी पुसली, वडापाव विकून पैसे कमावले.

फिल्म स्टुडिओमध्ये छोटी-मोठी कामं करताना ते दिग्दर्शन प्रक्रियेबद्दल जाणून घेऊ लागले.

दिग्दर्शक क्षेत्रातील प्रत्येक बारकावे ते शिकले आणि आता ते सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचे दिग्दर्शक बनले आहेत.

लक्ष्मण उतेकर यांना त्यांच्या करिअरमधील मोठा ब्रेक 2019 मध्ये ‘लुका छुपी’ या चित्रपटातून मिळाला.

यामध्ये कार्तिक आर्यन आणि कृती सनॉन यांच्या मुख्य भूमिका होत्या. अवघ्या 25 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या

या चित्रपटाने जगभरात 100 कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. त्यानंतर 2021 मध्ये उतेकरांनी पुन्हा

एकदा कृती सनॉनसोबत काम केलं. सरोगसीबद्दलची कथा सांगणाऱ्या ‘मिमी’

या चित्रपटाचं प्रेक्षक-समिक्षकांकडून प्रचंड कौतुक झालं. या चित्रपटातील

अभिनयासाठी क्रितीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा मिळाला.

Read more news here : https://ajinkyabharat.com/sonyane-marag-jhukkali-silver-suddenly-soft/