काही लाडक्या बहिणींकडे चारचाकी तर काही नोकरदार महिला, गोंदियात अपात्रतेची कुऱ्हाड; तुम्ही तर निकष डावलले नाही ना?

काही लाडक्या बहिणींकडे चारचाकी तर काही नोकरदार महिला, गोंदियात अपात्रतेची कुऱ्हाड; तुम्ही तर निकष डावलले नाही ना?

महाराष्ट्राच्या लाडकी बहीण योजनेची पात्रता पडताळणी सुरू असून, अनेक अपात्र लाभार्थ्यांचा शोध लागला आहे.

गोंदियात 50 महिलांना चारचाकी असल्याने अपात्र ठरवण्यात आले आहेत.

20 हून अधिक लाभार्थ्यांनी स्वतःहून योजना सोडली आहे. अर्थसंकल्पात 36 हजार कोटींची तरतूद असली तरी, निवडणूक

Related News

आश्वासनाप्रमाणे 2100 रुपये देण्याची घोषणा झालेली नाही, ज्यावरून विरोधकांनी टीका केली आहे.

विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प काल सादर करण्यात आला.

या सरकारच्या विजयात महत्वाचा वाटा बजावलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्तसंकल्पात 36 हजार कोटींची तरतूद करण्यात आली.

पण निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार, लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याबाबत मात्र

कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे.

दरम्यान लाडकी बहीण योजनेसाठी दिलेल्या अर्जांची पडताळणी करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असून काही

लाडक्या बहिणींकडे चारचाकी असल्याचे तर काही जणी नोकदार असल्याची माहिती समोर आली आहे.

गोंदियामध्ये अनेकींवर अपात्रतेची कुऱ्हाड लटकत आहेत.

विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली.

सुरुवातीला कोणतेही निकष नसल्याने मोठ्या प्रमाणात महिलांनी अर्ज दाखल करून लाभही घेतला.

आता मात्र पात्रतेचे निकष लावून पडताळणी सुरू केली आहे.या पडताळणीत गोंदिया जिल्ह्यातील 50 महिलांनी त्यांच्याकडे

चारचाकी वाहन असतानाही योजनेचा लाभ घेतल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांना अपात्र घोषित करण्यात आले

तर 20 महिलांनी स्वतःहून लाभ सोडण्यासाठी अर्ज केला असून 26 हजार 927 महिलांच्या अर्जांमध्ये त्रुटी आढळल्या.

राज्य शासनाने सुरू केलेली लाडकी बहीण योजना निवडणुकीच्या काळात चांगलीच गाजली. या योजनेमुळे सत्ताधारी मंडळीला लाभदेखील झाला.

मात्र आता शासनाच्या आदेशावरून योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांची पडताळणी सुरू आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यातील 3 लाख 64 हजार 245 लाडक्या बहिणींनी अर्ज केले होते.

या अर्जांची पडताळणी करण्याचे काम सध्या सुरू असून, यात 26 हजार 927 लाडक्या बहिणींच्या अर्जात त्रुट्या व ते निकषात बसत नसल्याने रद्द करण्यात आले.

त्यामुळे आता 3 लाख 14 हजार 17 लाडक्या बहिणी पात्र ठरल्या. सुरुवातीला या योजनेसाठी पात्र

नसलेल्या अनेक लाभार्थ्यांनी अर्ज करून या योजनेचा लाभ घेतला होता.

ही बाब शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर शासनाने अर्जाची पडताळणी करण्याचे निर्देश महिला व बालविकास विभागाला दिले.

त्यात चारचाकी असलेले लाभार्थी, नोकरीवर असलेल्या, आयकर भरणाऱ्या आणि लग्न होऊन दुसऱ्या राज्यात गेलेल्या

लाभार्थ्यांचे अर्ज रद्द करण्याचे निर्देश दिले तर काही लाभार्थी कारवाईच्या भीतीने अनुदान नको, म्हणून या विभागाकडे अर्ज करीत आहे.

काही अर्जाच्या पडताळणीत त्रुटी आढळल्या. त्यामुळे एकूण 26 हजार 927 अर्ज आतापर्यंत रद्द केले आहे. उल्लेखनीय म्हणजे मुख्यमंत्री माझी

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी सुरू आहे. त्यात 50 लाडक्या बहिणींकडे चारचाकी वाहने असल्याचे पुढे आले.

त्यामुळे त्यांचे अर्ज रद्द करण्यात आले आहे, तर काही अर्जांची पुन्हा पडताळणी केली जात असल्याची माहिती संबंधित विभागाने दिली.

लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभार्थी महिलांपैकी नोकरीवर असलेल्या व अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न

असणाऱ्या 20 लाडक्या बहिणींनी आतापर्यंत योजनेचा लाभ सोडण्यासाठी महिला व बालविकास विभागाकडे अर्ज केले.

Read more news here :https://ajinkyabharat.com/kadhi-vikala-vadapav-kadhi-pusli-ladi-chhava/

 

Related News