या धडकेमध्ये कारचे समोरून भागामध्ये नुकसान झालं. मात्र, सुनील शिंदे थोडक्यात बचावले. गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये बेस्ट बसेसच्या अपघातांची मालिकाच सुरू आहे.
मुंबईत बेस्टच्या बसेसचा प्रताप सुरुच असून आज मुंबईमध्ये दादर परिसरामध्ये शिवसेना आमदार सुनील शिंदे थोडक्यात बचावले.
मुंबई येथील दादर परिसरामध्ये प्रवास करत असताना सुनील शिंदे यांच्या फॉर्च्युनर कारला बेस्ट बसने धडक दिली.
या धडकेमध्ये कारचे समोरून भागामध्ये नुकसान झालं. मात्र, सुनील शिंदे थोडक्यात बचावले.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये बेस्ट बसेसच्या अपघातांची मालिकाच सुरू आहे.
गेल्यावर्षी कुर्ला रेल्वे स्थानकाबाहेर भीषण अपघात
दरम्यान, गेल्यावर्षी मुंबईतील कुर्लामध्ये 9 डिसेंबरच्या रात्री पावणे दहाच्या सुमारास कुर्ला रेल्वे स्थानकाबाहेर भीषण अपघात झाला होता.
खासगी बेस्ट बसचे नियंत्रण सुटून रस्त्यावरील अनेक लोक आणि वाहनांना चिरडले होते.
या अपघातात 49 जण जखमी झाले असून सात जणांचा मृत्यू झाला होता. 20-25 वाहनेही चक्काचूर झाली होती.
अपघातानंतर चालक फरार झाला होता. यानंतर बस ड्रायव्हर आणि कंडक्टरविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला.
काही वेळातच दोघांनाही अटक करण्यात आली. विशेष म्हणजे मुंबईत बेस्टच्या बसेसमध्ये दररोज अनेक अपघात होत असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
शहरातील लाखो लोक रोजच्या प्रवासासाठी बसचा वापर करतात. पूर्वी बस आणि चालक दोन्ही चांगले होते,
पण आता आलेल्या चालकांना बस चालवण्याचा अनुभव नाही, असे लोक सांगतात. तसेच या लोकांना जबाबदारी घ्यायची नाही.
बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना गृहित धरले जाते.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also :https://ajinkyabharat.com/accused-sanjay-roy-found-guilty-in-kolkata-doctor-rape-and-murder-case-within-5-months-monday-hearing-education/