जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी

जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी

जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आहे. दरम्यान चाकू आणि तलवारीने झालेल्या या हाणामारीत एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. हा वाद कावड यात्रा काढण्याच्या कारणावरून झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र घटनेच नेमकं कारण समजू शकले नाही. दरम्यान घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या सह पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला होताय. या प्रकरणी आता गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून कृषी नगर भागात सध्या पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. तर परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.

गजानन पडघन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अकोला.

Related News