जुन्या सेंट्रल नाक्यावर भंगार गोदामाला भीषण आग, अग्निशमन दलाने वेळेत आटोक्यात आणली

जुन्या सेंट्रल नाक्यावर भंगार गोदामाला भीषण आग, अग्निशमन दलाने वेळेत आटोक्यात आणली

अकोला महानगरपालिकेच्या नेहरू पार्क चौकातील जुन्या सेंट्रल नाक्याच्या भंगार

साहित्याच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

नेमकी ही आग कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Related News

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी तातडीने घटनास्थळी पोहोचली.

अग्निशामक जवानांनी तत्काळ प्रयत्न करून काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले.

या आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.

या आगीच्या कारणाचा शोध घेतला जात असून, प्रशासनाकडून तपास सुरू आहे.

Related News