जि.प. विद्यालय कामरगाव येथे ‘शाडू गणपती मूर्ती कार्यशाळा’ संपन्न; 100 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

बालकलाकारांनी साकारले शाडू मातीतून गणरायाचे रूप

कामरगाव  –पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश देत जि.प. विद्यालय,

कामरगाव येथे इको क्लब व स्काऊट-गाईड विभागाच्या संयुक्त विद्यमाने

शाडू गणपती मूर्ती कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

या कार्यशाळेत तब्बल १०० विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.

कार्यशाळेचे आयोजन :

या उपक्रमात इको क्लबचे गोपाल खाडे व गाईड युनिटच्या दिपाली खोडके यांनी प्रमुख भूमिका बजावली.

विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रा. सुरेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यशाळा पार पडली.

विशेष उपस्थिती :

केंद्रप्रमुख सै. कलीम सै. नसीर, विषयतज्ञ सचिन घुले व निरज खोरदडे

यांनी कार्यशाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे कौतुक केले.

विद्यार्थ्यांचा उपक्रम :

विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून कल्पकतेने विविध रूपातील गणराय साकारले.

या उपक्रमातून त्यांच्यामध्ये “निसर्गाशी एकरूप राहूनही सण साजरा करता येतो” ही जाणीव रुजली.

प्लॅस्टर ऑफ पॅरिसमुळे होणारे पाणी प्रदूषण व

रासायनिक रंगांचे दुष्परिणाम टाळण्याचा संदेशही या कार्यशाळेतून देण्यात आला.

read also: https://ajinkyabharat.com/mangrupeer-polisanchi-dhadkebaz/