पत्रकार व कलावंत हाफिज खान यांचे निधन; परिसरात शोककळा

पत्रकार व कलावंत हाफिज खान यांचे निधन

पत्रकार व कलावंत हाफिज खान यांचे निधन; परिसरात शोककळा

कारंजा : कारंजा तालुक्यातील सुप्रसिद्ध पत्रकार, कलावंत व गायक हाफिज खान (सदस्य – महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना, तालुका प्रतिनिधी – दैनिक दिव्य मातृछाया)

यांचे अल्पशा आजाराने ११ जुलै २०२५ रोजी निधन झाले. तब्येत बिघडल्याने त्यांना कारंजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

पत्रकारितेबरोबरच हाफिज खान यांनी नाट्य, भजन, भक्तिगीत व गायन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली होती.

त्यांच्या बहुआयामी कलागुणांना मान्यता मिळत विविध सन्मानपत्रांनी त्यांना गौरविण्यात आले होते.

मनमिळावू, मदतीस तत्पर आणि सर्वांशी जिव्हाळ्याने वागणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती.

त्यांच्या निधनाने पत्रकार बांधव, मित्रपरिवार, तसेच समाजातील विविध घटकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून परिसरात शोककळा पसरली आहे.

Read also :https://ajinkyabharat.com/dongarushevalet-asvalancha-dhumaku-citizens-citizen-environment/