किन्हीराजा | प्रतिनिधी
किन्हीराजा येथील शेतकरी आणि माजी सरपंच वैजनाथ आप्पा वसंत गोंडाळ यांच्या
शेतात घडलेल्या दुर्दैवी अपघातात ३ जनावरांचा विजेच्या शॉकने मृत्यू झाला आहे.
Related News
“भारताच्या अटींवरच उत्तर मिळेल; ऑपरेशन सिंदूरनंतर आदमपूरवरून मोदींचा संदेश”
“सरन्यायाधीशांच्या मातोश्रींचा स्पष्ट सूर : ‘बॅलेट पेपरच सुरक्षित, मतदारांचा विश्वास जपणं गरजेचं'”
दहावी नापास? चिंता नको! आता अकरावीमध्ये प्रवेशाचा मार्ग खुला
महागाईने झोप उडवली! वाढलेल्या दरांमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले, प्रवासही महागला
देशविरोधी बोललं तर बाय-बाय!” – पाकिस्तानी कलाकारांना भारतातून हद्दपार करण्याचा निर्णय
वैशाख पोर्णिमेच्या लख्ख प्रकाशात काटेपूर्णा अभयारण्यात प्राणी गणना
मान्सून अंदमानात दाखल! महाराष्ट्रात ६ जूनला होणार एंट्री
शोपियांमध्ये पहाटे अतिरेकी चकमक
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड
CBSE बारावी निकाल जाहीर,
“दहावीचा निकाल जाहीर,
“जो सिंदूर मिटवेल, तो मातीत मिसळेल…
गोंडाळ यांच्या शेतातून सोनल प्रकल्पावर जाणारी विद्युत वाहिनी गेली आहे.
या वाहिनीतील एक जिवंत वायर तुटून जमिनीवर पडली, आणि त्याचवेळी जनावरे शेतात
चराईसाठी असताना या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने तिन्ही जनावरे जागीच ठार झाली.
या घटनेत मृत्युमुखी पडलेली जनावरे अशी – १ म्हैस, १ गाय आणि १ बैल, ज्यांचे एकूण अंदाजे
२ लाख १० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे,
अशी माहिती तलाठी एन. व्ही. अंबुलकर यांनी पंचनाम्यातून दिली आहे.
स्थानिकांकडून महावितरणवर संताप
या घटनेमुळे गावकऱ्यांत संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी महावितरणच्या
हलगर्जीपणावर नाराजी व्यक्त केली असून, विद्युत विभागाने वारंवार तक्रार करूनही
जुनी आणि खराब वायर बदलण्यात दिरंगाई केली, असा आरोप करण्यात येत आहे.
शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका
वैजनाथ गोंडाळ यांचं शेती आणि दुग्धव्यवसायावर मोठं आर्थिक अवलंबित्व असून,
या घटनेने ते मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
प्रशासनाकडून त्वरित आर्थिक मदतीची मागणी होत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/vaishakh-pornemechaya-lakhkkat-katapurna-sanctuary-cross/