जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना पेन, पेन्सिल वाटप

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना पेन, पेन्सिल वाटप

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना पेन, पेन्सिल वाटप; विद्यमान सरपंच पंती यांचा वाढदिवस साजरा

मोखा :
‘हर घर तिरंगा’ या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोखा तसेच मोखा-जानोरीमेळ गट ग्रामपंचायतीत नुकतेच भव्य झेंडावंदन कार्यक्रम पार पडला.

याच कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यमान सरपंच पंती यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

या वाढदिवसानिमित्त सरपंच पंती यांनी जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना लेटर, पेन, पेन्सिल, शार्पनर आदी शालेय साहित्याचे वाटप केले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य पसरले.

कार्यक्रमाला ग्रामपंचायत सचिव के. एस. कौसकार, सरपंच मयुरीताई श्रीहर्ष खरप, ग्रामपंचायत कर्मचारी किशोर बागडे, ऑपरेटर राहुल गावंडे, रोजगार सेवक बाप्पा बागडे,

माजी सरपंच मोहन वानखडे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य जगन्नाथ गावंडे यांसह जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे

मुख्याध्यापक श्रीकांत गाठे, मुंडे, कुलकर्णी, वासनकार तसेच ‘जीवाला मित्र मंडळ’ सदस्य नंदू तायडे, विजय तायडे, अंबादासजी घेंगे, उकर्डा गवई, देवानंद तायडे, शिवाजी तायडे, रमेश शेगोकार आदी मान्यवर उपस्थित होते.

दोन्ही शाळांमध्ये झेंडावंदनानंतर शालेय साहित्य वाटप सोहळा झाला. सरपंच पंती यांच्या या उपक्रमामागील उद्देश – इतरांनीही अशा प्रकारे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे – असा होता.

यापूर्वीही ‘जीवाला मित्र मंडळा’च्या वतीने शाळेत निबंध स्पर्धा घेऊन सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आले होते.

वाढदिवसानिमित्त गावकऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी सरपंच पंती यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या व कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

READ ALSO :https://ajinkyabharat.com/american-bla-best-pakistan/