कळंबी महागाव प्रतिनिधी श्रीकृष्ण पवार
बाळापुर तालुक्याअंतर्गत येत असलेले मनारखेड येथील रेल्वे गेट 31 सी ते मनारखेड गावापर्यंत
पोच रस्ता दुरुस्ती करणेबाबत दिनांक 16/1/ 2025 रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांच्याकडे योगेश ज्ञानदेव शेळके माजी सरपंच राहणार मनारखेड
तालुका बाळापूर जिल्हा. अकोला यांनी निवेदन देऊन तब्बल सहा महिने होऊन अद्याप पर्यंत कुठलेही
निवेदनाची दखल घेण्यात आली नसुन अद्याप कुठेलेही दुरुस्तीचे काम चालू झाले नसून विद्यार्थ्यांना दररोज
या रस्त्याने ये जा करावे लागते मनारखेड गावंच्या रस्त्याची दैनंदिन परिस्थिती बिकट असल्यामुळे गावातील शेतकरी ,
शेतमजूर, व विद्यार्थी यांना नाहक त्रास सहन करावा लागतो आता तरी वरील विषयाचा गंभीरतेने विचार करून रेल्वे गेट 31 सी ते मनारखेड गावापर्यंत पोच
रस्ता तात्काळ दुरुस्ती करून देण्यात यावा असे निवेदनाद्वारे कळविण्यात आले होते.
