जिल्हाधिकाऱ्यांची अचानक रुग्णालयाला भेट
आरोग्य विभागात उडाली खळबळ
अकोला जिल्ह्यातील नवजात शिशुगृह निविदा प्रकरणात झालेल्या गैरव्यवहारानंतर तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय आणि जिल्हा स्त्री रुग्णालयाला अचानक भेट दिली. यादरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णांना मिळणाऱ्या सुविधा, वैद्यकीय उपचार व जेवणाची पाहणी केली. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश देण्यात आले. ही आकस्मिक भेट दिल्याने आरोग्य विभागातील कारभाराची सखोल चौकशी सुरू असल्याचे स्पष्ट करणारी असून संपूर्ण आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे.