जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे परळीत उल्लंघन

पोलीस ठाण्यासमोर ईद-ए-मिलाद बॅनरवर वाल्मिक कराडचा फोटो;

 बातमी: – बीड जिल्ह्यातील परळीत एका मोठ्या घडामोडीने खळबळ उडवली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याचा फोटो ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर तसेच स्वागत कमानीवर झळकल्याचे समोर आले आहे.

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी 10 ऑगस्ट रोजी स्पष्ट आदेश जारी करून म्हटले होते की, जिल्ह्यातील अनधिकृत मजकूर, गुन्हेगारांचे फोटो अशा प्रकारच्या बॅनरवर छापणे, तसेच सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत फलक लावणे पूर्णपणे बंद करण्यात यावे. सामाजिक सलोखा राखण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी अशा बॅनर व फलकांची तपासणी करण्याची आणि तात्काळ कारवाई करण्याची सूचना देण्यात आली होती.

परंतु, प्रशासनाच्या स्पष्ट आदेशाचे उल्लंघन करत परळीत हे बॅनर पोलीस ठाण्याच्या समोर व नगरपरिषद जवळच लावण्यात आले होते. या बॅनरवर सरपंच देशमुख हत्याकांडातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड यासह राष्ट्रवादी काँग्रेस युवक नेते धनंजय मुंडे याचे फोटोही नमूद करण्यात आले आहेत.

ही घटना सामाजिक सलोखा आणि कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे करत असून, आता जिल्हाधिकारी प्रशासनाच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाने त्वरित या बॅनर व अनधिकृत फलकांविरोधात काय तीव्र कारवाई करेल का, याची उत्सुकता व्यक्त केली जात आहे.

सदर घटना महाराष्ट्रातील लोकशाही व्यवस्थेच्या नियमांचे उल्लंघन असल्याने जनतेतही चांगलीच चिंता निर्माण झाली आहे. आता प्रशासनाच्या पुढील पावलावरून भविष्यातील कारवाईचा मार्ग निश्चित होणार आहे.

read also :https://ajinkyabharat.com/4100-villages-jalmay-56-deathy-4-koti-folk-affected/