अकोला : शहरात महालक्ष्मी देवीची स्थापना विविध देखाव्यांतून करण्यात येते.
यंदा मालगे परिवाराने देवीच्या पूजेसाठी राजस्थानी सजावटीचा अनोखा देखावा उभारला आहे.
या देखाव्यात पारंपरिकता आणि आकर्षकतेचा संगम साधण्यात आला असून परिसरात त्याची विशेष चर्चा सुरू आहे.
मालगे परिवारातील मयुरी रितेश मालगे, शारदा मालगे,
छाया मालगे, स्वाती सचिनराव निळे, सविता वानखडे
आणि शितल मालगे यांनी सजावटीची जबाबदारी सांभाळली.
संपूर्ण परिसराला राजस्थानी संस्कृतीचा स्पर्श देणारी ही मांडणी भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे.
विशेष म्हणजे, महालक्ष्मी मातेची महाआरती अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक
आर्चित चांडक यांच्या हस्ते पार पडली.
यावेळी जुने शहर पोलीस निरीक्षक विल्हेकर साहेबही उपस्थित होते.
कार्यक्रमात जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे स्वागत रितेश मालगे,
सचिन निळे, अनिल मालगे, गजानन मालगे, आशिष मालगे व संतोष मालगे यांनी केले.
या प्रसंगी बोलताना अर्चित चांडक यांनी मालगे परिवाराच्या नाविन्यपूर्ण
उपक्रमाचे कौतुक करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.