झुबीन गर्गची शेवटची इच्छा

जीवनाच्या शेवटच्या क्षणांची खुलासा

आसामी लोकप्रिय गायक झुबीन गर्ग याच्या अकस्मात निधनाने देशभरात शोककळा पसरली आहे. सिंगापूरमध्ये स्कूबा डाइव्हिंगदरम्यान झुबीन गर्ग याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर झुबीनच्या चाहत्यांमध्ये शोककळा असून सोशल मीडियावर त्यांच्या आठवणी आणि भावनांचे जाहीरकरण जोरदार होत आहे.

झुबीन गर्गच्या जानेवारी 2025 मध्ये दिलेल्या मुलाखतीत त्याने त्याची शेवटची इच्छा स्पष्ट केली होती. त्याने सांगितले होते की –“माझे शेवटचे क्षण महाबहू ब्रह्मपुत्र रिव्हर हेरिटेज केंद्र येथे घालवायचे आहेत. तिथे एक छोटासा बंगला आहे, मी तिथेच राहीन आणि तिथेच अखेरचा श्वास घेईन. माझ्यावर अंत्यसंस्कार तिथेच करावेत किंवा मला ब्रह्मपुत्रा नदीत वहावं.”

या मुलाखतीत झुबीनने स्वतःला एक साधा पण आनंदी व्यक्ती म्हणून वर्णन केले, ज्याला आयुष्यातील सर्व काही लोकांना द्यायचे आहे, स्वतःसाठी काही ठेवायचे नाही.

माहितीनुसार, झुबीन गर्गला सिंगापूरमध्ये स्कूबा डाइव्हिंग दरम्यान श्वास घेण्यास अडचण निर्माण झाली. त्यानंतर त्याला सिंगापूरमधील जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, जिथे दुपारी अडीच वाजताच्या सुमारास डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

शनिवारी झुबीनचा पार्थिव विमानाने गुवाहाटी येथे आणण्यात आला. विमानतळावर त्याच्या चाहत्यांनी मोठी गर्दी करून त्याला श्रद्धांजली अर्पण केली.

झुबीन गर्गचा अचानक मृत्यू त्यांच्या चाहत्यांसाठी धक्का देणारा आहे. त्यांच्या शेवटच्या इच्छेप्रमाणे ब्रह्मपुत्रा नदीत त्यांची अस्थी विसर्जित करणे, त्यांच्या चाहत्यांसाठी एक भावनिक स्मरण राहणार आहे.

read also :https://ajinkyabharat.com/administration-citizen-gesture/