झोपेची गोळी देऊन पतीला झोपवलं, गळा दाबून ठार; पत्नीनेच पुसलं स्वतःचं कुंकू!

झोपेच्या गोळ्या देऊन पती ठार; पत्नीची घृणास्पद कृत्ये उघडकीस

हैदराबाद – पती-पत्नीच्या नात्याला कलंक लावणारी एक धक्कादायक

घटना तेलंगणातील हैदराबादमध्ये घडली.

चिट्टी नावाच्या महिलेने तिच्या प्रियकरासोबत कट रचून पती जेलेला शेखर

(वय ४०) याची निर्घृण हत्या केली. घटनेनंतर मृत्यू हृदयविकाराच्या

झटक्याने झाल्याचे भासवण्याचा तिचा प्रयत्न अखेर पोलिसांच्या चौकशीत फसला.

शेखर हा कॅब ड्रायव्हर होता. पत्नी चिट्टीचे हरीश नावाच्या तरुणासोबत अफेअर सुरू होते.

शेखरला पत्नीच्या वागण्याबद्दल संशय आला.

त्याने तिला याबाबत जाब विचारल्यानंतर प्रेमात अडथळा ठरतोय

या भीतीने चिट्टी आणि प्रियकराने त्याचा काटा काढण्याचे ठरवले.

घटनादिवशी शेखर घरी आल्यावर जेवणात झोपेची गोळी दिली.

गाढ झोपेत असतानाच चिट्टीने हरीशला घरी बोलावले.

दोघांनी मिळून शेखरचा गळा दाबला आणि डोक्यावर काठीने प्रहार केला.

त्यानंतर कोणालाही संशय येऊ नये म्हणून चिट्टीनेच १०० वर

फोन करून पतीला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती दिली.

पोलिसांनी तपास सुरू केला असता सत्य समोर आलं.

कडक चौकशीत चिट्टीने प्रियकरासोबत खून केल्याची कबुली दिली.

सध्या आरोपी पत्नी पोलिस कोठडीत असून फरार हरीशचा शोध सुरू आहे.

या घटनेने सरूरनगर परिसरात खळबळ उडाली आहे.

Read also : https://ajinkyabharat.com/akot-talukayati-deori-gawacha-mancha-ganpati-shekado-cultural-tradition-japanara-fokmare-fokra/