जीवन खवले यांच्या पाठपुराव्याला यश : दहिहाडा फाटा–गोपालखेड रोडचे काम सुरू
अकोट : प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हाप्रमुख तसेच सामाजिक कार्यकर्ते जीवन खवले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे दहिहाडा फाटा ते गोपालखेड या रोडचे काम अखेर सुरू झाले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने प्रवाशांना तसेच वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. अपघातांचा धोका वाढला होता.जीवन खवले यांनी या गंभीर प्रश्नाची दखल घेत वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदनं दिली होती. “काम न झाल्यास रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये बसून आंदोलन करू,” असा इशारा त्यांनी दिला होता. या इशाऱ्यानंतर विभागाने तातडीने हालचाल करत रस्त्याचे काम सुरू केले.या कामामुळे नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला असून, लोकांनी खवले यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. नागरिकांनी “आमच्या समस्येसाठी सातत्याने आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्याचे हे यश आहे,” अशा शब्दांत त्यांचे आभार मानले.
प्रतिक्रिया
जीवन खवले, उपजिल्हाप्रमुख – प्रहार जनशक्ती पक्ष
“मी या रोडसंदर्भात वेळोवेळी निवेदन देऊन संबंधित विभागाला सूचना दिल्या होत्या. त्यांनी दोन दिवसांत काम सुरू करू असे आश्वासन दिले होते. आज प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे. जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे, या भावनेतूनच मी हे प्रयत्न केले.”
या कारवाईमुळे दहिहाडा फाटा–गोपालखेड रस्त्याचा प्रश्न सुटण्यास सुरुवात झाली असून, लवकरच प्रवाशांना खड्डेमुक्त रस्ता मिळणार आहे.
read also : https://ajinkyabharat.com/entrepreneurship-awareness-program-concluded/
