जास्तच सुंदर समजतेय तिला सांगून ठेवा

ऐश्वर्याबद्दल हिमानी शिवपुरींचा धक्कादायक खुलासा!

मुंबई :बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या प्रेमकथांपैकी एक म्हणजे अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांचं नातं. या नात्याबद्दल अनेकदा चर्चा रंगल्या, पण अखेर त्याचा शेवट ब्रेकअपमध्ये झाला. आता ज्येष्ठ अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांनी दोघांबद्दल मोठा खुलासा केला आहे.

एका मुलाखतीत हिमानी यांनी सांगितलं की, “हमारा दिल आपके पास है” या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ऐश्वर्या आणि सलमान यांचं नातं अतिशय चांगलं होतं. ऐश्वर्यासोबत गप्पा मारायला मला खूप आवडायचं. पण एकदा अचानक सलमान आला आणि संतापात म्हणाला – ‘तिला सांगा, स्वतःला जास्तच सुंदर समजते!’ तेव्हा मी त्याला शांत राहायला सांगितलं.

हिमानी पुढे म्हणाल्या की, शूटिंगदरम्यान रोज रात्री सलमान ऐश्वर्याला भेटायला यायचा आणि सकाळी निघून जायचा. त्या काळात दोघांचं नातं खूप चर्चेत होतं.

सलमान – ऐश्वर्याचा ब्रेकअप

संजय लीला भन्साळी यांच्या “हम दिल दे चुके सनम” चित्रपटाच्या सेटवर दोघांचं प्रेम फुललं. मात्र 2002 मध्ये त्यांचं नातं तुटलं. नंतर ऐश्वर्याने अभिषेक बच्चनसोबत नातं जोडून 2007 मध्ये लग्न केलं. आज त्या आपल्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहेत.

सलमान खान मात्र आजही अविवाहित आहे. त्याचं नाव अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं, पण कोणतंही नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही.

 या खुलाशामुळे पुन्हा एकदा सलमान – ऐश्वर्या यांच्या नात्याची जुनी आठवण चाहत्यांमध्ये ताजी झाली आहे.

read also :https://ajinkyabharat.com/team-indiacha-first-face-pakistan/