जरांगेंनी विधानसभेच्या 288 जागा लढवाव्यात; प्रकाश आंबेडकरांचा सल्ला

मनोज जरांगे

मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवली पाहिजे

असे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

 मनोज जरांगे पाटील यांनी 288 जागांवर विधानसभा निवडणूक लढवली पाहिजे.

Related News

ते लढतीलही अशी अपेक्षा असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख

प्रकाश आंबेडकर  यांनी व्यक्त केले. ते नांदेडमध्ये  प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. 20 जुलैनंतर 288 जागांवरील उमेदवार पाडायचे

की निवडून आणायचे हे ठरवू असे वक्तव्य जरांगे पाटील यांनी केले होते.

यावर आंबेडकरांनी त्यांनी 288 जागांवर निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला आहे.

आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे २० जुलैपासून उपोषणाला बसणार आहेत.

काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीत २८८ जागा लढवण्याबद्दल विचारले असता

जरांगे पाटील म्हणाले की, मी २० तारखेला उपोषणाला बसतोय,

त्या दिवशी मराठा समाजाची किती तारखेला बैठक घ्यायची ते ठरवले जाईल.

महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज त्या दिवशी बैठकीला एकत्र येईल

आणि त्याच दिवशी मराठा समाजाला विचारून मी ठरवणार आहे की,

२८८ निवडून आणायचे की पाडायचे, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले होते.

Read also: https://ajinkyabharat.com/prime-minister-narendra-modis-new-vikram/

Related News