जपानच्या शास्त्रज्ञांनी दिला महाभूकंपाचा इशारा

जपान

दोन दिवसांपूर्वी बसलेल्या ७.१ रिश्टरच्या भूकंपाच्या धक्क्यानंतर

आता जपानमधील शास्त्रज्ञांनी जपानला महाभूकंपाचा धक्का

बसणार असल्याचा इशारा दिला आहे.

Related News

भूगर्भात अत्यंत वेगाने हालचाली होत असून, त्याचाच परिणाम म्हणून

महाभूकंप होण्याची शक्यता आहे व तो ८ ते ९ रिश्टर क्षमतेचा असू शकतो,

असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

गुरुवारी जपानला ७.१ आणि ६.९ रिश्टर क्षमतेच्या भूकंपाने हादरे दिले होते.

यावेळी या भूकंपाने बऱ्यापैकी नुकसानही झाले व १४ जण जखमी झाले.

यानंतर आता जपानच्या शास्त्रज्ञांनी महाभूकंपाचा इशारा दिला आहे.

एवढा मोठा भूकंप शतकातून एखादाच असतो, तरी सावध राहायला हवे.

या इशाऱ्यानंतर जपानचे पंतप्रधान फुमिओ किशीदा मध्य आशियाचा दौरा

अर्धवट टाकून परतले आहेत. पंतप्रधान म्हणून आपत्कालीन स्थितीत

आपण हजर असणे महत्त्वाचे असल्याने किमान एक आठवडा तरी आपण

जपानबाहेर जाणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. महाभूकंपाच्या इशाऱ्यानंतर

नागरिक सतर्क झाले असून, भीतीचे वातावरण पसरले आहे.

अनेकांनी खाण्या- पिण्याच्या अत्यावश्यक वस्तूंचा घरात साठा करून घेणे सुरू केले आहे.

बुलेट ट्रेनचा वेगही घटवण्यात आला आहे. तसेच जपानमधील

सर्वच अणुऊर्जा प्रकल्पांना आपापली सुरक्षा यंत्रणा पुन्हा एकदा बारकाईने

तपासून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जपानी शास्त्रज्ञांच्या या इशाऱ्यानंतर

जपानमधील भारतीय दूतावासाने जपानमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी

मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार नैसर्गिक आपत्तीसाठी

तयार राहावे व आपल्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे असे कळवण्यात आले आहे.

याशिवाय जपान सरकारकडून वेळोवेळी जारी होणाऱ्या सूचनांचे

तंतोतंत पालन करण्यासही सांगण्यात आले आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/rachael-lillis-who-voices-the-characters-of-the-pokemon-series/

Related News