जि.प. शाळेमध्ये नवनिर्वाचित शिक्षकांचा सत्कार

"नवनिर्वाचित शिक्षकांचा सत्कार"

कळंबी महागाव : बाळापुर तालुक्यातील कळंबी महागाव येथील जि.प.प्राथमिक शाळेत आज, २५ सप्टेंबर २०२५ रोजी नवनिर्वाचित शिक्षकांचा सत्कार आयोजित करण्यात आला. याच कार्यक्रमात तंटामुक्ती अध्यक्षांचा देखील सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेश सावळे यांनी सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा पूजन व वंदन करून केली. त्यानंतर विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारे आणि त्यांना योग्य दिशा दाखविणारे शिक्षक वृंद अमित वाघमारे, दत्तात्रय घोगले, सुषमा देशमुख, उमेश सावळे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक गजानन बावस्कर, पोलीस पाटील चंद्रमणी सावळे, उपसरपंच विजय सावळे, सावळे बोध्दाचार्य जुगल सावळे, सामाजिक कार्यकर्ते दिवाकर सावळे, भारत सावळे, गोविंदा सावळे, विनोद सावळे, प्रदीप सावळे, शरद इंगळे, संतोष कासारकर, अंगणवाडी सेविका सुवर्णा सावळे, उमेश सावळे, आणि पत्रकार श्रीकृष्ण पवार हजर होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी तंटामुक्त अध्यक्ष कडू सावळे यांनी केले.शाळेच्या या कार्यक्रमामुळे शिक्षकांना व त्यांच्या कार्याला मान्यता मिळाली असून, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची खात्री करण्यास शाळा व स्थानिक समाज बांधिल असल्याचे दिसून आले.

read also : https://ajinkyabharat.com/buldhana-district-banjara-samajacha-historical-grand-front/