अकोट –भारतीय जनता पक्षातर्फे सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येत असून यामध्ये विविध सामाजिक सेवा भावी उपक्रम राबविले जात आहेत. हे उपक्रम जनतेपर्यंत पोहोचवून त्याचा लाभ जनतेला द्यावा व सातत्याने जनतेच्या संपर्कात राहावे, असे आवाहन आमदार प्रकाश भारसाकळे यांनी केले.ते भाजपातर्फे आयोजित कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. सेवा पंधरवाडा हा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबरपासून सुरू होऊन २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीपर्यंत चालणार आहे. आकोट शहर व ग्रामीण मंडळ भाजपाच्या वतीने ही कार्यशाळा श्री संत नरसिंग महाराज मंदिर सभागृहात पार पडली.कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. मंचावर आमदार भारसाकळे यांच्यासह अकोला जिल्हा ग्रामीण भाजपा अध्यक्ष संतोष शिवरकार, जिल्हा सरचिटणीस राजेश नागमते, अॅड. रुपाली काकडे, ग्रामीण अध्यक्ष गोपाल मोहोड व शहराध्यक्ष हरीश टावरी यांची उपस्थिती होती.पुढे बोलताना आमदार भारसाकळे म्हणाले की, “सेवा पंधरवाड्यातील उपक्रमांमुळे जनतेसोबतचे संबंध अधिक दृढ होतील आणि त्याचा फायदा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना मिळेल.”जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकार यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी आतापासूनच कामाला लागण्याचे आवाहन केले.कार्यशाळेत अॅड. रुपाली काकडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कमी केलेल्या जीएसटी दरांविषयी माहिती दिली. यामुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळेल, असे त्यांनी सांगितले.प्रास्ताविक राजेश नागमते यांनी केले. कार्यशाळेचे संचालन माजी नगरसेवक व सरचिटणीस मंगेश लोणकर यांनी केले तर तालुका सरचिटणीस गजानन आकोटकर यांनी आभार मानले.या कार्यक्रमाला मा. नगराध्यक्ष, नगरसेवक, प.स. सदस्य, भाजप जिल्हा, ग्रामीण व शहर पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, विविध मोर्चा, आघाडी अध्यक्ष तसेच सेल व प्रकोष्ठ संयोजक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
read also:https://ajinkyabharat.com/rashtri-vikasasathi-satyachi-kas-dhara/
