जळगावाच्या पारोळा तालुक्यातील शिवरे दिगर येथे सारंग माध्यमिक
विद्यालयात गणपती विसर्जनानिमित्त भंडाऱ्याचा कार्यक्रम ठेवण्यात
आला होता. या भंडाऱ्यात शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी जेवण केले.
Related News
मात्र या जेवणातून तब्बल 113 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. या विद्यार्थ्यांना
तामसवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहेत. सध्या
त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर आमदार चिमणराव पाटील,
माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, डॉ. हर्षल माने, डॉ. संभाजी पाटील यांनी
विद्यार्थ्यांची भेट घेतली. जळगावातील सारंग माध्यमिक विद्यालयात गणपती
विसर्जनानिमित्त आयोजित केलेल्या भंडाऱ्यातून अनेक विद्यार्थ्यांना विषबाधा
झाली आहे. या भंडाऱ्यात वरण-भात, गुलाब जामुन, भाजी असे जेवेण होते.
यावेळी शिक्षक आणि विद्यार्थी मिळून हे जेवण जेवले. हे जेवण जेवल्यानंतर
काही विद्यार्थी-विद्यार्थिनींना उलट्या, चक्कर, मळमळ होणे, हातपाय गळणे
इत्यादी त्रास होऊ लागला. यानंतर त्यांना तामसवाडी येथून पारोळा या ठिकाणी
उपचारासाठी पाठवण्यात आले. साधारण 5 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत या
विद्यार्थ्यांवर उपचार सुरू होते. त्यानंतर केलेल्या तपासणीदरम्यान विद्यार्थ्यांना
अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती समोर आली.
Read also: https://ajinkyabharat.com/prime-ministers-meeting-in-doda-today/
