जालन्यात धनगर आरक्षण आंदोलन

सदावर्तेंचा जरांगे पाटीलांना खोचक टोला

जालन्यापासून: राज्यातील आरक्षणाचा वाद पुन्हा एकदा तापला असून, जालन्यात धनगर समाजाच्या आंदोलनासारख्या मुद्द्यामुळे राजकीय चर्चेला वेग मिळाला आहे. आज ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जालन्यात येऊन धनगर आरक्षणासाठी आंदोलन करत असलेल्या आंदोलकांची भेट घेतली.सदावर्तेंनी बोलताना पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्यावर थेट निशाणा साधला आणि खोचक टोला लगावला. त्यांनी म्हटले, “ज्यांना संविधानाची माहिती नाही, ते असे हल्ले करतात. मनोज जरांगे पाटील यांच्या दलालांच्या पोलिसांनी मुसक्या आवळलेल्या आहेत. माझ्या धनगर बांधवांसाठी मी इथे आलो आहे. मराठा बांधव मागास नाहीत, त्यांना ओबीसीमध्ये एन्ट्री मिळणार नाही.”सदावर्तेंनी जरांगे पाटील यांच्या परंपरेवर देखील टीका केली: “लोक मुलींना नांदायला पाठवतात, मात्र जरांगे पाटील हे स्वतः नांदायला सासुरवाडीला आले आहेत. जरांगे ढोंग करत आहेत आणि मराठा बांधवांची फसवणूक करत आहेत. आता लवकरच तुमचं गाठोडं बांधलं जाणार आहे. पुढची भेट अंतरवाली सराटीमध्येच होईल.”दरम्यान, सदावर्तेंच्या जालन्यात येताना त्यांच्या वाहनावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. सदावर्तेंच्या आरोपानुसार, हा हल्ला मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांनी केला.राज्यात मराठा आरक्षण, ओबीसी विरोध, तसेच एसटी समाजासाठी आरक्षण यांसारख्या मुद्यांवर सध्या तापलेली राजकीय वातावरण आहे. जालन्यातील धनगर आरक्षण आंदोलनामुळे हे चर्चेचे केंद्र बनले आहे, आणि सदावर्तेंच्या प्रतिक्रिया यामध्ये नवीन वळण घालत आहेत.

read also : https://ajinkyabharat.com/aisathi-dedicated-gaan-mhanatana-modi-bhavuk/