जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांचा बुलडाणा जिल्हा दौरा

जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांचा बुलडाणा जिल्हा दौरा

प्रशासनिक आढावा, विद्यार्थ्यांचा गौरव व समाजबांधवांशी संवाद साधणार…

लोणार (प्रतिनिधी)

दिनांक ३१ जुलै २०२५ जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललितजी गांधी यांचा

दिनांक ३१ जुलै २०२५ रोजी बुलडाणा जिल्हादौरानिश्चित झालाअसूनत्यांच्या या दौऱ्यात प्रशासनिक बैठक,

पुरस्कार वितरण सोहळा व समाजबांधवांशी संवाद असा त्रिसूत्री कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

ललित गांधी हे सकाळी बुलडाणा येथे दाखल होताच सर्वप्रथम जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तसेच

विविध प्रशासकीय विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांबरोबर आढावा बैठक घेणार आहेत.

यामध्ये राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विभागांतर्गत जैन समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या विविधयोजनांचा आढावा घेतला जाणार आहे.

विशेषतः महामंडळाच्या माध्यमातून अल्पसंख्याक जैन समाजासाठी उपलब्ध निधी, उद्योजकांना कर्ज सुविधा,

शैक्षणिक मदत, स्वयंपरिणाम योजनांची अंमलबजावणी आदी बाबीवर सविस्तर चर्चा अपेक्षित आहे.

या बैठकीनंतर गांधी यांच्या उपस्थितीत भगवान महावीर निर्वाण आणि जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध

स्पर्धेतील जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयांतील

विद्यार्थ्यांनी या निबंध स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. समाजिक व आध्यात्मिक मूल्यांवर आधारित महावीर

स्वामी यांच्या जीवनकार्यावर विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या निबंधांची गुणवत्ता पाहता त्यांचा सन्मान करणे अत्यंत गरजेचे

असल्याचे आयोजकांनी सांगितले.यानंतर गांधी हे बुलडाणा जिल्ह्यातील जैन समाजाचे प्रतिनिधी, व्यापारी,

उद्योजक, युवा कार्यकर्ते यांच्याशी थेट संवाद साधणार आहेत. या संवादाच्या माध्यमातून महामंडळाच्या विविध योजना

आणि त्यांचा लाभ घेण्यासाठीची प्रक्रिया समजावून सांगितली जाणार आहे. तसेच जिल्ह्यातील समाजाच्या गरजा, समस्या,

अपेक्षा यावरही सविस्तर चर्चा होणार आहे.जैन अल्पसंख्याक समाजासाठीशासनस्तरावर कार्यरतअसलेल्या या महामंडळाच्या

अध्यक्षांचा जिल्हा दौरा ही एक महत्त्वपूर्ण संधी मानली जात असून त्यांच्या उपस्थितीमुळे समाजासाठी नव्या संधींचे दरवाजे खुले होतील,

अशी आशा व्यक्त केली जात आहे. गांधी हे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रात जैन समाजाच्या

सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्यरत आहेत.या दौऱ्याच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक

जैन संस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, विविध संस्था व मंडळांनी गांधी यांचे स्वागत करण्यासाठी तयारी केली आहे.

जिल्हा दौऱ्याच्या निमित्ताने शासन व समाज यांच्यातील संवाद अधिक बळकट होईल,

असा विश्वास स्थानिक जैन बांधवांनी व्यक्त केला आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/patur-nandapur-complex-rimjhim-pavasane-picana-dil-jeevan-dadan-shetkari-only-crisis/