जयदीप आपटेच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

चेतन पाटीलचा

चेतन पाटीलचा जामीन अर्ज फेटाळला

सिंधुदुर्गमधील मालवण परिसरातील राजकोट किल्ल्यावर असलेला

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या प्रकरणानंतर

Related News

मुख्य आरोपी असलेला जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांना अटक

करण्यात आली होती. प्रमुख आरोपी असलेल्या जयदीप आपटेला 13

सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर चेतन पाटील

याला न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आज त्यांची मुदत

संपल्यानतर पुन्हा जयदीप आपटे आणि चेतन पाटील या दोघांनाही

न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यानंतर आता मोठी अपडेट समोर

आली आहे. सिंधुदुर्ग मालवणमधील पुतळा दुर्घटना प्रकरणी जयदीप आपटे

याची आज पोलीस कोठडीची मुदत संपली. त्यांनी मालवण पोलिसांनी जयदीप

आपटेला मालवण न्यायालयासमोर हजर केले. तर दुसरीकडे या प्रकरणी सह

आरोपी असलेल्या बांधकाम सल्लागार चेतन पाटील याने जामीनासाठी अर्ज केला

होता. या जामीन अर्जावर ओरोस येथील जिल्हा न्यायालयात सुनावणी पार पडली.

त्यामुळे जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांचं काय होणार, याकडे सर्वांचेच

लक्ष लागले होतं. अखेर मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटना

प्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या जयदीप आपटे याला २४ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन

कोठडी सुनावण्यात आली आहे. जयदीप आपटे हा गेल्या आठ दिवसांपासून

मालवण पोलीस कोठडीत आहे. त्यानंतर आज त्याला मालवणच्या दिवाणी

न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी हा निर्णय देण्यात आला. तर दुसरीकडे

सिंधुदुर्ग मालवणमधील पुतळा दुर्घटना प्रकरणी बांधकाम सल्लागार असलेल्या चेतन

पाटीलचा जामीन न्यायालयाने नाकारला आहे. त्यामुळे त्याला येत्या १९ सप्टेंबरपर्यंत

जेलमध्येच मुक्काम करावा लागणार आहे. सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी

यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी चेतन पाटीलच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

करण्याची मागणी केली होती. तर चेतनने जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.

नुकत्याच झालेल्या सुनावणीत चेतन पाटीलचा जेलमधील मुक्काम अजून सहा दिवसांनी

वाढला आहे. त्यामुळे त्या 19 सप्टेंबरपर्यंत जेलमध्येच राहावं लागणार आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/manoj-jarange-patil/

Related News