अकोला – चान्नी-स्थानिक जय बजरंग युवक मंडळाद्वारे चालविलेल्या जय बजरंग कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (NSS) दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून डॉ.नागुलकर उपस्थित होते, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष गजाननभाऊ इंगळे होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.डॉ.निवृत्ती वरखेडे यांनी केले. विद्यार्थी युवकांनी आपले आचरण स्वच्छ ठेवावे, असे विचार प्रेमानंद श्रीरामे यांनी व्यक्त केले. डॉ.नागुलकर यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाची खरी महत्त्वाची गोष्ट सांगितली की,मानवाने आयुष्यभर शिकत राहणे आवश्यक आहे. अध्यक्षीय भाषणात गजाननभाऊ इंगळे यांनी जात-पंथ-धर्माच्या पलीकडे जाऊन राष्ट्राची सेवा करणे ही खरी सेवा असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश सोनोने केले, तर आभार शुभांगी देशमुख हिने मानले. कार्यक्रमात संतोष इंगळे, अनिरुद्ध इंगळे आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
read also : https://ajinkyabharat.com/tarun-talkit-name-ki-gale/