जगविख्यात साहित्य सम्राट क्रांतीसुर्य ज्ञानसुर्य डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा!

विविध मागण्या ची केली निवेदनाद्वारे मागणी!

मुंडगाव प्रतिनिधी..

येथील आकोट तालुक्यातील मातंग समाजातील कार्यकर्ते तसेच आकोट तालुक्यातील सकल मातंग समाजाच्या वतीने

अकोला जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले की जगविख्यात साहित्य सम्राट क्रांतीसुर्य ज्ञानसुर्य डॉ. अण्णा भाऊ साठे

यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा! १ ऑगस्ट रोजी जगविख्यात साहित्य

सम्राट ज्ञानसुर्य डॉ. अण्णा भाऊ साठे यांची १०५ वी जयंती ऊसव सोहळा भारत रसिया – वॉस्को व संपूर्ण जगात साजरा होत

असुन अण्णा भाऊ साठे यांचा संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सिंहाचा वाटा असून त्यांच साहित्य व कादंबऱ्या हे भारत देशाच्या

विकासासाठी अमृतदायी ठरल्या असुन त्यांच्या लेखणीने समाजाला परिवर्तनाची दिशा दाखवली आहे.

त्यांच्या या समाज सुधारणेच्या चळवळीचा आदर करून डॉ. अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे

तसेच एस सी अनुसूचित जाती जमातीत लवकर उपवर्गीकरण करण्यात यावे.

१ ऑगस्ट रोजी ज्ञानसुर्य डॉ. अण्णा भाऊ साठे जयंती निमित्त सरकारने एक दिवस दारू दुकान बंद ठेवण्याचा आदेश द्यावा.

महाराष्ट्रात मातंग समाजातील लोकांवर झालेल्या हल्ल्याची सि बि आय चौकशी करावी.

अशा आशयाचे निवेदन अकोला जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे . सदर निवेदनावर प्रभाकर हरिभाऊ गवई,

राजु किसन तायडे, अनील अरून तायडे, सागर ओंकार तायडे, सागर ओ तायडे, कैलास जगन खंडारे, कैलास खंडारे,

विजय रमेश पवार, रवी विठ्ठल तायडे, शुभम वसंत गवई, नागोराव पाटेकर, सुरेशभाऊ कलाने, यांच्या सह्या आहेत.

Read Also : https://ajinkyabharat.com/drug-crude-kykyansamore-tasanatas-ranga-milk/