जळगाव जिल्ह्यातील पाचोर्याच्या सातगाव डोंगरी परिसरात एक अजब अफवा पसरली, ज्यामुळे गावात थरार आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. गावकरी अचानक धरण फुटल्याची अफवा ऐकून पळत सुटले, तर काहीजण डोंगरावर जाऊन थांबले.गावकऱ्यांची झोप मात्र उडाली होती. अफवा इतकी जोरदार होती की काही लोकांनी थेट गाव सोडले, तर काही धरणाजवळ जाऊन परिस्थिती पाहण्याचा प्रयत्न केला. मात्र नंतर काही सुज्ञ तरुणाने प्रत्यक्ष धरणाचे चित्रीकरण करून सर्व ग्रामस्थांना दाखवले. परिणामी, धरण फुटले नसल्याचे उघड झाले आणि सर्वांना दिलासा मिळाला.ही घटना सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरत असून, अफवांचा परिणाम आणि ग्रामस्थांमधील भीतीचे प्रमाण स्पष्ट झाले आहे.
read also : https://ajinkyabharat.com/thane-kalyan-dombivali-mahapalika-punha-dharchat/
