जगातील सर्वात गरीब राष्ट्रपती, कधीच राष्ट्रपती भवनात राहिले नाहीत…

जगातील सर्वात गरीब राष्ट्रपती, कधीच राष्ट्रपती भवनात राहिले नाहीत... अचानक चर्चेत का आले होसे मुइका?

होसे मुइका यांचा जीवनप्रवास हा एका क्रांतिकाऱ्यापासून राष्ट्रपतीपदापर्यंतचा विलक्षण प्रवास होता.

1960-70 च्या दशकात त्यांनी तुपामारोस नावाच्या डाव्या विचारसरणीच्या गोरिल्ला चळवळीचे नेतृत्व केले.

त्यांनी सैन्य हुकूमशाहीविरोधात संघर्ष केला आणि त्यासाठी सुमारे 15 वर्षे तुरुंगवास भोगावा लागला,

Related News

यापैकी 10 वर्षं अत्यंत कठोर एकांतवासात त्यांनी काढली.

का आलेत ते पुन्हा चर्चेत?

2024 मध्ये होसे मुइका यांनी जाहीर केलं होतं की त्यांना एसोफॅगिअल (अन्ननलिकेचा) कर्करोग झाला आहे,

जो नंतर यकृतापर्यंत (लीवर) पसरला. त्यांनी उपचार थांबवण्याचा निर्णय घेतला

आणि आयुष्याचे शेवटचे दिवस मॉन्टेविडियोजवळील स्वतःच्या छोट्याशा शेतात घालवले – जिथे ते राष्ट्रपती असतानाही राहायचे.

राष्ट्रपती भवनात राहणं नाकारलं

“जर एखादा राष्ट्रपती आलिशान जीवन जगतो, तर तो जनतेपासून विभक्त होतो,”

असं मुइका यांनी स्पष्ट सांगितलं होतं.

 म्हणून त्यांनी राष्ट्रपती असतानाही प्रेसिडेंशियल पॅलेसमध्ये कधीही राहणं स्वीकारलं नाही.

तुरुंगातील भयावह अनुभव

एका मुलाखतीत मुइका यांनी सांगितलं होतं की:

  • सहा महिने त्यांच्या हातांना मागून लोखंडी तारांनी बांधून ठेवलं गेलं.

  • दोन वर्षांपर्यंत त्यांना संडासालाही जाण्याची परवानगी नव्हती.

‘सर्वात गरीब राष्ट्रपती’ का म्हणतात?

  • ते पगाराच्या 90 टक्के रक्कमेचे दान करायचे.

  • एक जुनी 1978 मॉडल बीटल कार वापरायचे.

  • छोट्या शेतात राहून साधं, सामान्य माणसासारखं आयुष्य जगायचे.

  Read Also : https://ajinkyabharat.com/chakanamadhyay-mahilela-furfat-nirjanasthi-neon-rape/

Related News