जगातील ५ सर्वात छोटे मोबाईल फोन; माचिसच्या डबीतही बसतील
मोठ्या स्क्रीनचे स्मार्टफोन हातात घेणारे बरेच लोक आपण पाहतो, पण छोट्या व कॉम्पॅक्ट मोबाईल फोनची क्रेझ आजही टिकून आहे.
कॉलिंग, मेसेजिंग आणि काही मॉडेल्समध्ये कॅमेरासारखी सुविधाही देणारे हे मिनी फोन आकाराने इतके लहान आहेत की सहज माचिसच्या डबीतही मावतात.
येथे अशा ५ मिनी मोबाईल फोनची माहिती दिली आहे, जे तांत्रिकदृष्ट्या रोचक, हलके आणि अतिशय पोर्टेबल आहेत.
१. Zanco Tiny T1
जगातील सर्वात छोटा मोबाईल म्हणून ओळखला जाणारा हा फोन फक्त 46.7 मिमी लांब आणि 13 ग्रॅम वजनाचा आहे. 0.49 इंच OLED स्क्रीन, 2G नेटवर्क सपोर्ट, 300 कॉन्टॅक्ट्स सेव्ह करण्याची क्षमता आणि 200 mAh बॅटरी यामध्ये आहे. स्टँडबायवर बॅटरी ३ दिवस टिकते.
२. Zanco Tiny T2
Tiny T1 चे अपग्रेडेड व्हर्जन. यात 3G सपोर्ट, कॅमेरा, 128MB RAM, 64MB स्टोरेज आहे. वजन फक्त 31 ग्रॅम आणि बॅटरी बॅकअप ७ दिवसांचा. यात म्युझिक, व्हिडिओ आणि बेसिक गेम्सचा आनंद घेता येतो.
३. Unihertz Jelly 2
जगातील सर्वात छोटा 4G स्मार्टफोन. 3 इंच स्क्रीन, Android 11, 6GB RAM, 128GB स्टोरेज, फेस अनलॉक, GPS, कॅमेरा, Wi-Fi आणि Google Play Store सपोर्टसह. वजन फक्त 110 ग्रॅम पण फीचर्स मोठ्या स्मार्टफोनसारखे.
४. Light Phone 2
फक्त कॉल आणि मेसेजसाठी डिझाइन केलेला मिनिमल फोन. ई-इंक डिस्प्ले, 4G सपोर्ट, सोशल मीडिया, गेम्स किंवा अॅप्स नाहीत – फक्त आवश्यक सुविधा. साइज लहान, डिझाइन प्रीमियम आणि बॅटरी लाईफ जास्त.
५. Kyocera KY-01L
“जगातील सर्वात पातळ मोबाईल” म्हणून ओळख. फक्त 5.3 मिमी जाडी आणि 47 ग्रॅम वजन. 2.8 इंच मोनोक्रोम स्क्रीन, कॉल, मेसेज आणि ब्राउझिंगसाठी उपयुक्त. क्रेडिट कार्डसारखा दिसणारा हा फोन जपानमध्ये खूप लोकप्रिय.
READ ALSO :https://ajinkyabharat.com/karachitil-goli-jabrat-3-thar-70-hoon-more/
