आयटीआर भरण्याची शेवटची संधी: 15 सप्टेंबरनंतर दंड होऊ शकतो

उशिरा भरल्यास दंड किती?

आयकर रिटर्न (ITR) भरण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2025 आहे. या तारखेपर्यंत रिटर्न न भरल्यास करदात्यांना आर्थिक दंड भरण्याची शक्यता आहे. सरकारने सर्व करदात्यांना वेळेवर आयटीआर भरण्याचे आवाहन केले आहे.

उशिरा भरल्यास दंड किती?

आयकर कायद्याच्या कलम 234F नुसार, निर्धारित वेळेनंतर रिटर्न भरल्यास दंड आकारला जातो.

  • वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास: ₹1,000

  • वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास: ₹5,000
    पूर्वी हा दंड 10 हजार रुपये होता, आता 5 हजार रुपये पर्यंत मर्यादित केला आहे.

15 सप्टेंबरनंतरही आयटीआर दाखल करता येणार

ज्या करदाते 15 सप्टेंबरपर्यंत आयटीआर दाखल करू शकणार नाहीत, त्यांना असेसमेंट इयर संपण्याच्या तीन महिने आधी किंवा असेसमेंट वर्ष संपण्यापूर्वी आयटीआर दाखल करण्याची संधी मिळेल. मात्र, यावेळीही दंड भरावा लागणार आहे.

वेळेवर आयटीआर भरणे फायदेशीर

वेळेवर रिटर्न भरल्यास दंड टळतो आणि विविध सरकारी फायदे मिळू शकतात. त्यामुळे करदात्यांनी शक्य तितक्या लवकर आयटीआर भरण्याचे आवाहन केले आहे.

ऑनलाइन आयटीआर कसा भरावा?

  1. Income Tax e-Filing Portal ला लॉगिन करा.

  2. पॅन कार्ड नंबर आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा. (आधारकार्ड लिंक आवश्यक)

  3. ‘फाइल इन्कम टॅक्स रिटर्न’ वर क्लिक करा आणि असेसमेंट वर्ष 2025-26 निवडा.

  4. उत्पन्नानुसार आयटीआर फॉर्म निवडा, माहिती तपासा आणि सबमिट करा.

अवघ्या काही मिनिटांत घरबसल्या आयटीआर भरता येऊ शकतो.

read also : https://ajinkyabharat.com/urdu-teacher-anani-businessman-mitrachi-ats-kelly-chowki/